घरताज्या घडामोडीवंचित बहुजन आघाडीचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित, प्रकाश आंबेडकरांची माहिती

वंचित बहुजन आघाडीचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित, प्रकाश आंबेडकरांची माहिती

Subscribe

नुपूर शर्मा यांच्याविरोधात कारवाई झाली पाहीजे...

प्रेषित पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्याचा मुंबईतील शांती मोर्चा स्थगित केला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उद्याचा शांती मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात हा शांती मोर्चा काढला जाणार होता. मात्र, हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की, पैगंबर मोहम्मद यांच्या नावाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेत जे बील सादर करण्यात आले होते. त्या बिलाला सरकारने गंभीरपणे घेतलं पाहीजे. त्यावर राजकारण होऊ शकतं. हे आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं. तेच आज सिद्ध झालं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न; कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा – गृहमंत्री

राज्य सरकारने या दोन्ही गोष्टींना गांभीर्याने घेतलं आहे. मुंबईच्या आयुक्तांनी मंत्री महोदयांसमोर आश्वासन दिलं आहे की, लवकरात लवकर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या दोन मागण्या मान्य झाल्या असून, सरकारने हा विषय गांभिर्याने घेतला, त्यामुळे उद्याचा मुंबईतील शांती मोर्चा स्थगित केल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : नुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही ट्विट करत दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गृहमंत्र्यांनी साधला प्रसार माध्यमांशी संवाद

बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्मा आणि जिंदाल यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहीजे. कायदेशीर प्रक्रियेबाबत त्यांची मागणी असून या संबंधित आम्ही इतर लोकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहोत, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.


हेही वाचा : पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात, कृषीमंत्री दादा भुसेंचे शेतकऱ्यांना आवाहन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -