घरमहाराष्ट्रShambhuraj Desai : जरांगेंनी विनाकारण पुन्हा-पुन्हा आंदोलन करू नये; शिंदे गटाचे आवाहन

Shambhuraj Desai : जरांगेंनी विनाकारण पुन्हा-पुन्हा आंदोलन करू नये; शिंदे गटाचे आवाहन

Subscribe

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यावर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. मंत्री देसाई म्हणाले की, उपोषण करण्याचं जरांगे पाटलांनी जरी जाहीर केलं असलं तरी, मात्र आता त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत.

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचे आज जाहीर केले. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विनाकारण पुन्हा-पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. ते आज (5 फेब्रुवारी) मंत्रिमंडळाच्या बैठीकनंतर मीडियाशी बोलत होते. (Shambhuraj Desai Jarange should not protest again and again for no reason Appeal of Shinde group)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यावर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. मंत्री देसाई म्हणाले की, उपोषण करण्याचं जरांगे पाटलांनी जरी जाहीर केलं असलं तरी, मात्र आता त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. ज्या सगेसोयऱ्यांच्या विषयासंदर्भात अधिसूचना काढायची होती त्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे असेही यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

एकदा अधिसूचना काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे. वेळोवेळी जारंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की, माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. त्याचप्रमाणेच मंत्रिमंडळाने अधिसूचना काढून त्यांचे प्रश्न निकाली काढले आहेत. सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली असून, त्याबाबतीत जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये, अशी त्यांना माझी विनंती आहे. असेसुद्धा आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केले.

हेही वाचा : Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये येणार समान नागरी कायदा, मंगळवारी सादर होणार विधेयक

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळही होते बैठकीला उपस्थित

आंदोलनातील सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले असताना विनाकारण पुन्हा- पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये. सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. सरकारने जो शब्द दिला आहे, जे आश्वासन दिलं आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे. त्याबाबतीत आमची कार्यवाही सुरू असल्याचे सांगतच मंत्री छगन भुजबळ हेसुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीतल्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : IND vs ENG: इंग्रजांना चारली धूळ; 106 धावांनी भारताचा दणदणीत विजय

संजय राऊतांच्या आरोपांना गांभीर्याने घेऊ नका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, संजय राऊतांना नेहमीच भडकविण्याची सवय आहे. संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरगं सुद्धा गांभीर्यानं घेत नाही. तेव्हा त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी, माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नये. ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही. सकाळचा भोंगा वाजतो. तो कधी खरा नसतो. त्यामुळे संजय राऊत असे कितीही वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्याने कुणी लक्ष देत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -