घरमहाराष्ट्रशरद पवार, अजित पवारांसह ७० संचालकांवर ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगचे गुन्हे दाखल

शरद पवार, अजित पवारांसह ७० संचालकांवर ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगचे गुन्हे दाखल

Subscribe

शिखर बँक घोटाळा

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरू झालेली असताना राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सहकारी बँकेच्या ७० संचालकांवर मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी अडचणीत वाढ झालेली आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा नोंदवला आह

२००५ ते २०१९ या कालावधीत राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी आपले आर्थिक हितसंबंध जपत कर्जाचे वाटप केले. सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांना कर्ज दिली. राज्य सहकारी बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बर्‍याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेले होते.सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत ते विकण्यात आली होती. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकण्यात आले होते. हे सर्व नियमबाह्य कर्ज साधारणत: १५०० कोटींपेक्षा अधिक आहेत. त्यावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर हे गुन्हे दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काल झाला शरद पवारांवर गुन्हा दाखल?
शरद पवार हे कोणत्याही राज्य सहकारी बँकेचे संचालक नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र पवार हे कोणत्याही बँकेचे संचालक नसले तरी त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याकडे डोळेझाक केली, असे मत मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. त्यावरून त्यांच्यावर रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण हे प्रकरण १५०० कोटींपेक्षा जास्तीचे असल्यामुळे मुंबई पोलिसांनी ते ईडीकडे वर्ग केले. मुंबई पोलिसांच्या एफआयआरवरून ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.

या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संचालक मंडळलावर कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, मधुकरराव चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, माणिकराव पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, मदन पाटील, अमरसिंह पंडीत, शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, राजन तेली, प्रसाद तनपुरे, सुरेश देशमुख, शिवाजीराव नलावडे यांच्यासह ७० सहकारी बँकांच्या संचालकांचा समावेश आहे.

- Advertisement -

माझ्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही. मी बँकेचा संचालक कधीच नव्हतो. आमच्या दौर्‍याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ही कारवाई झाली असेल तर त्याचे परिणाम काय होतील हे मी सांगू
शकत नाही. मी तुरुंगातही जाण्यास तयार.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -