घरBudget 2024Pravin Darekar : जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार; दरेकरांनी केला पुनरुच्चार

Pravin Darekar : जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार; दरेकरांनी केला पुनरुच्चार

Subscribe

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास दाखवत होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच अंतरवली सराटीत जी घटना घडली त्या कटात माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार यांचा सहभाग असल्याचा मोठा आरोपही यावेळी दरेकरांनी केला. विशेष म्हणजे गुरुवारी विधानसभेतली अशाप्रकारचे आरोप करण्यात आले होते. (Sharad Pawar behind Manoj Jaranges agitation Praveen Darekar reiterated)

हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षणाला हायकोर्टात आव्हान; सदावर्तेंनी दाखल केली याचिका

- Advertisement -

भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाचा विषय गांभीर्याने घेऊन 10 टक्के आरक्षण देऊन समाजाला दिलासा देण्याचे काम केले. आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरही महाराष्ट्रात अशांतता, अराजकता पसरवली जाते की काय अशा प्रकारचे चित्र जरांगे यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाले आहे. अनेक गोष्टी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आल्या आहेत.

जरांगे पाटलांसोबत काम करणारे बारसकर महाराज ज्यांनी जरांगेंच्या सांगण्यावरून कोपर्डी प्रकरणात कोर्टाबाहेर आरोपींवर हल्लासुद्धा करण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्या बारसकरांनी अंतरवली सराटीत जी काही दगडफेकीची घटना झाली त्याचे प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर झाल्याचे म्हटले आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यावर हे षडयंत्र रचले गेले. त्यावेळी रोहित पवारही राजेश टोपे यांच्यासोबत होते. हे प्लॅनिंग करणाऱ्या टोपे आणि पवार यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकरांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर आता राहुल गांधीही काळारामाच्या दर्शनाला

दरेकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गुन्हे दाखल केले होते. या राज्यात सरकार म्हणून सर्वांना एकच न्याय पाहिजे. जरांगे आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे. राज्यात दोन कायदे होऊ शकत नाहीत. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच दुसऱ्यावर आरोप करताना महाराष्ट्रात सभा झाल्या. जेसीबीतून फुलांची उधळण झाली. जरांगे म्हणाले होते समाजाकडून एक रुपया घेणार नाही. मग या सभांना लाखो रुपये, ट्रॅक्टरला 30 हजार रुपये द्यायला आले कुठून? असा सवाल करत या सर्व आर्थिक व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही दरेकरांनी केली. दरम्यान, दरेकर यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भुमिका घेत याप्रकरणी एसआयटी नेमू. त्या चौकशीत जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. सुडबुद्धीने कुणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले.

शरद पवारच मराठा आरक्षणाचे मारेकरी – दरेकर

शरद पवार हेच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही शरद पवारांनाच विश्वासात घेत होते. जरांगे यांचे बॅनर लावणारे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांचेच होते. याचा पुरावा बारसकर महाराजांकडे आहे. शरद पवार जसे सांगतात तसेच जरांगे करतात. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, असे दरेकर यांनी सभागृहात संगीता वानखेडे यांचा दाखला देत म्हटले की, जरांगे यांना शरद पवारांचे फोन येत होते, असे संगीता वानखेडे सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपाची शासन स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकरांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -