घरमहाराष्ट्रSharad Pawar: शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदी गॅरंटी; शरद पवारांची घणाघाती टीका

Sharad Pawar: शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदी गॅरंटी; शरद पवारांची घणाघाती टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांचा आज लोणावळा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला.

लोणावळा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांचा आज लोणावळा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी अजित पवार गटाच्या 137 कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं यापलिकडे या सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे, असा घणाघात त्यांनी केला. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar Narendra Modi guarantee time for farmers to commit suicide Sharad Pawar criticizes PM Modi)

काय म्हणाले शरद पवार?

पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जातं आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्याच मोदींची गॅरंटी देत आहेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे, तर जनेतेच्या पैशाने, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी ग‌‌ॅरंटी दिली, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

ममता बॅनर्जीवरही मोदी टीका करतात

शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींचं भाषण पाहा. काल ते बंगालमध्ये होते, तिथे ममता ब‌नर्जींवर बोलले. ममता आणि मी एकत्र काम केलं आहे. त्यांच्या घरी मी गेलो आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं आहे. अशा वाघीणीवर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे. पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत. हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

(हेही वाचा: Coastal Road : मुंबईत 320 एकरचं सेंट्रल पार्क, कोस्टल रोडच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंची माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -