घरमहाराष्ट्रशरद पवार यांचा उदयनराजेंना टोला; 'हे बरं नव्हं'

शरद पवार यांचा उदयनराजेंना टोला; ‘हे बरं नव्हं’

Subscribe

'छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर राजे त्या दराबारातून निघून गेले आणि आता? हे वागणे बरे नव्हे', असे शरद पवार साताऱ्यातील सभेत म्हणाले.

भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर होते. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी भव्य रॅलीचे आयोजन केले. त्यानंतर शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर राजे त्या दराबारातून निघून गेले आणि आता? हे वागणे बरे नव्हे’, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण!

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 22, 2019

- Advertisement -

नेमके काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत सत्ताधारी भाजप पक्षावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. मात्र, राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत. ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथे हॉटेल आणि बार उभे करण्याचे नियोजन सरकार करत आहे. त्या जागांविषयी सरकारला आत्मियता नाही.’ यापुढे शरद पवार म्हणाले की, ‘एकेकाळी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. त्यांनी महाराजांना दराबारात सन्मान होईल, असा शब्दही दिला होता. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. त्यामुळे महाराज तेथून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण, राजे त्यातूनही सुटले आणि परत महाराष्ट्रात येऊन त्यांनी इतिहास घडवला.’ यानंतर आणि आता? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर ‘हे वागणे बरे नव्हे’, असे उद्गार शरद पवार यांनी काढले.


हेही वाचा – Video : ‘…मोदी-शहांचा बाप आला’; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -