घरमहाराष्ट्रतुम्ही गुपचूप भेटा, प्रेमाने भेटा...; शरद पवार-अजित पवार भेटीवर अमृता फडणवीसांचं विधान

तुम्ही गुपचूप भेटा, प्रेमाने भेटा…; शरद पवार-अजित पवार भेटीवर अमृता फडणवीसांचं विधान

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या काका पुतण्यांची पुण्यातील एका बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर भेट झाल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली. अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत (BJP) गेल्यानंतर चौथ्यांदा भेट घेतली आहे. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र यांच्याभेटीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी शरद पवार आणि अजित पवार भेटीवर सूचक विधान केलं आहे. (You meet secretly meet with love Statement of Amrita Fadnavis on Sharad Pawar Ajit Pawar meeting)

मुंबईत भारती लव्हेकर यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी टीव्ही 9 या वृत्तसंस्थेशी बोलताना विधान केलं की, मला कल्पना नाही की, गुपचूप कोण भेटत आहे. पण भेटणे कधीही चांगलं असतं. गुपचूप भेटा किंवा सर्वांसमोर भेटा, पण प्रेमाने भेटा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भेटत राहा, असे सूचक विधान अमृता फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेतील फुटीवेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस गुप्तपणे कसे भेट घेत होते. त्यावेळीही अमृता फडणवीस यांनी केलेल्या काही विधानांचीही चांगलीच चर्चा रंगली होती.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष

निवडणुकांमध्ये काय होणार यासंदर्भात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल आणि त्यांच्याबरोबर युती केलेले पक्षही पहिल्या क्रमांकावर निवडून येतील, विरोधक फक्त विरोध करतील, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी मंगळागौर उत्सवाला लावली हजेरी

वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार व  ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांनी श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे काल रात्री शानदार आयोजन केले होते. यावेळी 3000 हून अधिक महिलांची उपस्थिती होती. अमृता फडणवीस यांनी मराठमोळी नववारी साडी नेसून मंगळागौर उत्सवात सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि उपास्थित महिलां सोबत फुगडी घालून आणि “मी फिरते मळ्यात,नजर माझी तळ्यात,देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात” असा अस्सल मराठी उखाणा घेत या मंगळागौर उत्सवात त्यांच्या फुगड्या आणि उखण्याने चांगलीच रंगत आणली.

हेही वाचा – Sharad Pawara-Ajit Pawar Meeting : काका पुतण्याच्या भेटीची पृथ्वीराज चव्हाणांना शंका तर दानवे म्हणाले…

शरद पवार – अजित पवार भेट

दरम्यान, शनिवारी (12 ऑगस्ट) शरद पवार व अजित पवार यांनी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर गुप्त भेट घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. अजित पवार यांनी शरद पवारांना सरकारमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिल्याचं बोललं जात आहे. तसेच भेट शरद पवार गटातील जयंत पाटील यांनी आयोजित केल्याचीही चर्चा आहे. परंतु ही भेट झाली की नाही, याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी, अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

नवाब शरीफ व नरेंद्र मोदी भेटू शकतात, तर शरद पवार व अजित पवार काही? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. तसेच शरद पवार दोन दिवसांत अधिकृत भूमिका मांडतील, असं सूचक विधानही त्यांनी केले. याशिवाय जयंत पाटील जर सरकारमध्ये आले, तर शरद पवारही आले, असं म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया  शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी दिली. अशा प्रकारे संभ्रम निर्माण होणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. तसेच अशी कोणतीही भेट अजित पवार व शरद पवार यांच्यात झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -