घरमहाराष्ट्रनिमंत्रण द्यायला 'ती' काही सत्यनारायणाची पूजा नव्हती; वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला

निमंत्रण द्यायला ‘ती’ काही सत्यनारायणाची पूजा नव्हती; वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला

Subscribe

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे कॉंग्रेसच्या साथीने 1999 मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.

शेगाव (बुलढाणा) : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष आता जोमाने तयारी लागले आहेत. एकीकडे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत तर दुसरीकडे काही पक्षातील नेते आपली ताकद वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना साद घालत आहेत. अशातच आता कॉंग्रसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण का दिले गेले नाही याबाबत विचारले असता त्यांनी ती काही सत्यनारायणाची पुजा नव्हती निमंत्रण द्यायला असे म्हणत चांगलाच टोला लगावला आहे. सोबतच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तेव्हा पुढील काळात या आवाहनाला प्रकाश आंबेडकर कशी साद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (‘She’ was not the worship of some Satyanarayana to invite; Vadettivar’s Tola to Ambedkar)

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे कॉंग्रेसच्या साथीने 1999 मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. 2004 नंतर वाटीघाटीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसची साथ सोडली होती. तेव्हापासून ते कधी एकटे तर कधी युती करताना दिसतात. यादरम्यानच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सोबत येण्याचे आवाहन केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

जातीयवादी शक्ती घालवण्यासाठी एकत्र या, कॉंग्रेसची वंचितला साद

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणार का असे विचारले असता ते म्हणाले की, मला वाटते की, पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन जातीवादी शक्तीला घालवणे महत्त्वाचे आहे. आमची प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे, आवाहन आहे, सूचना आहे की, आपण एकत्र लढू… पुरोगामी विचारायला घेऊन पुढे जाऊ. महाराष्ट्रातून जातीवादी शक्तीला बाहेर घालवू अशी साद त्यांनी प्रकाश आंबेडकरांना घातली आहे.

हेही वाचा : राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही…, ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका

- Advertisement -

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का?

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ईडब्‍ल्‍युएस आरक्षण न मागता दिले होत तर मराठ्यांना त्याच धर्तीवर आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का? असा थेट सवाल त्यांनी राज्यसरकारला विचारला. तर पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षण द्यायची तुमची नियत असेल तर झटक्यात प्रश्न सुटेल असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण करणाऱ्यावर कारवाई नको; विखे पाटलांची सूचना

‘श्रीं’चे दर्शन घेऊन अकोटकडे रवाना

काँग्रेसची जनसंवाद यात्रा बुधवारी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली होती. वडेट्टीवार हे रात्री विशेष निमंत्रणावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी भोजनासाठी आले होते. यानंतर मुक्‍कामी राहून सात सप्टेंबर रोजी गुरुवारी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते अकोटकडे रवाना झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -