घरताज्या घडामोडीEOW : अजित पवारांना दिलासा! शिखर बँक घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर...

EOW : अजित पवारांना दिलासा! शिखर बँक घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शिखर बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अजित पवार हे या बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मात्र या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी रिपोर्ट देखील सादर केला आहे. न्यायालयात याप्रकरणी येत्या 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांनी अर्ज सादर केल्यानंतर आता विरोधक या मुद्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. EOW ने तपास बंद करण्याचा अहवाल (Closer Report) न्यायालयात सादर केला आहे. पुढील सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येणार आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकारला तर अजित पवार या घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत संधान बांधून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंचन घोटाळ्यातून ते बाहेर पडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता शिखर बँक घोटाळ्यातूनही ते निश्चित बाहेर पडतील, तेव्हा या घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता उत्तर दिले पाहिजे की, चक्की कोण पिसिंग? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांच्या अहवालाला आव्हान देणार

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी तपास बंदचा अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे 15 मार्चला होणार आहे. मात्र या प्रकरणी आमच्या याचिका प्रलंबित असताना तपास यंत्रणांनी तपास बंदचा अहवाल कसा काय सादर केला असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Crime: शिवसेना आमदारांच्या बाचाबाचीनंतर भाजपा मंत्र्याने केली मारहाण; मरीन ड्राइव्ह ठाण्यात तक्रार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -