घरमहाराष्ट्र...नाहीतर प्रकाश आंबेडकरांची कोणासोबत युती होणार नाही; शिंदे गटातील आमदाराचा सल्ला

…नाहीतर प्रकाश आंबेडकरांची कोणासोबत युती होणार नाही; शिंदे गटातील आमदाराचा सल्ला

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. यात वंचित बहुजन आघाडी आता शिंदे फडणवीस सरकारसोबतच्या युतीवरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी त्यानंतर आम्ही युतीचा विचार करु, अशी भूमिका आज प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. यावर आता शिंदे गटातील एका आमदारांनेही प्रकाश आंबेडकरांना एक सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करु नये, अशा मागणी शिंदे गटातील नेत्यांकडून दबक्या आवाजात सुरु आहे. अशात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राजकारणात भूमिका थोडी मागे पुढे करावी लागते म्हणत जर तस प्रकाश आंबेडकर यांनी केलं नाही वाटत नाही त्यांची कोणासोबत युती होईल, अस स्पष्ट भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत जास्त न ताणता योग्य भूमिका तातडीने जाहीर करावी. जणेकरून येणाऱ्या निवडणुकीत वेगळा संदेश त्यांना देता येईल. ते मोठे नेते आहेत.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार. भाजपला आमचा विरोधा कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही विचार करु तसेच येणाऱ्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी, पण आमची युती चार भितींच्या आत ठरली. मात्र त्याची घोषणा झालेली नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे, असही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


मुंबईकरांनो गुडन्यूज! मेट्रोची 2 आणि 7 मार्गिका 19 जानेवारीपासून होणार खुली; वाचा सविस्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -