घरताज्या घडामोडीSanjay Raut : आता जे लवाद म्हणून बसलेत त्यांनी स्वत:च 10 पक्षांतरे...

Sanjay Raut : आता जे लवाद म्हणून बसलेत त्यांनी स्वत:च 10 पक्षांतरे केलीत; राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

Subscribe

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलायत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवार, 7 मार्च रोजी सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यवर निशाणा साधला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलायत (Supreme Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवार, 7 मार्च रोजी सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यवर निशाणा साधला. ‘विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचं आहे ते ठरत नाही. पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचं आहे, यावर पक्ष कोणाचा आहे हे ठरतं. पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण त्यांच्यावर दबाब होता’, असे म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला. (shiv sena mp sanjay raut slams rahul narvekar and eknath shinde group on supreme court hearing on mla disqualification)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधातील याचिकेवर भाष्य केले. त्यानुसार, “विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदांना पात्र ठरवलं. घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यानुसार, पक्षांतर केलेल्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवणं हे अपर्हाय होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं. इतकंच नव्हे तर विधिमंडळीतील पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:चं हसू करून घेतलं”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवाय, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या याच निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितले की, हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचं आहे ते ठरत नाही. पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचं आहे, यावर पक्ष कोणाचा आहे हे ठरतं. पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण त्यांच्यावर दबाब होता”, असेही संजय राऊत म्हणाले.

“आता जे लवाद म्हणून बसलेत त्यांनी स्वत:च 10 पक्षांतरे केलीत आहेत, ते कधी शिवसेनेत होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, ते कधी अन्य पक्षात होते आणि त्यानंतर ते भाजप पक्षात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने काल दखल घेतल्याचे त्यांच्या निकालपत्रावरून दिसते आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की, लवादाने शिंदे गटाच्या बाजूने कोणताही निकाल दिला असला तरी, सर्वोच्च न्यायालयाने या देशाला आशेची किरणं दाखवली आहेत. त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही आशावादी आहोत. फक्त वेळ काढू पण नको. शिंदे गटाचे जे वकील आहेत, ते रोज नवीन मुद्दा आणत असून खोटेपणा त्यांच्या मुद्द्यामध्ये असतो”, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

- Advertisement -

“खरं म्हणजे सुनावणी संपलेली असताना केवळ निकाल द्यायच्यावेळी नवीन मुद्दे आणण्याचे काही कारण नाही. शिंदे गटाच्या वकिलांनी काल सांगितले की, उद्धव ठाकरेंच्या गटाने बनावट कागदपत्र आणली. कोणती बनावट कागदपत्र आणली. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे बनावट आहेत का? बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे का? ही लोक बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्वच मानत नाहीत, हाच त्यांचा बनावटपणा आहे. त्यामुळे आम्ही लढू आमची लढाई उत्तम सुरू असून विजय आमचा होईल”, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.


हेही वाचा – Thackeray on BJP: जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी लावला न्यायव्यवस्थेचा निकाल; ठाकरे गटाचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -