घरमहाराष्ट्रSupriya Sule on Amit Shah : ...हा व्यवहार नाही तर, समाजसेवा; सुप्रिया...

Supriya Sule on Amit Shah : …हा व्यवहार नाही तर, समाजसेवा; सुप्रिया सुळेंचा अमित शहांवर पलटवार

Subscribe

पुणे : महाराष्ट्राची जनता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना गेल्या 50 वर्षांपासून सहन करते आहे. शरद पवार यांनी मागील किमान 5 वर्षांचा हिशेब जनतेला द्यावा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. तथापि, हा व्यवहार नसून समाजसेवा आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा – Thackeray on BJP: जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी लावला न्यायव्यवस्थेचा निकाल; ठाकरे गटाचा टोला

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अमित शहा हे अलीकडेच दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील सागर पार्कवर 25 हजार युवकांसोबत संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शदरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राची जनता शरद पवार यांना गेल्या 50 वर्षांपासून सहन करते आहे. शरद पवार यांनी मागील 50 वर्षांचा सोडा, किमान 5 वर्षांचा हिशेब जनतेला द्यावा, मी 10 वर्षांचा हिशेब द्यायला तयार आहे, असे आव्हान अमित शहा यांनी दिले होते.

पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले. हिशेब कसला? हा व्यवहार नाही, ही तर समाजसेवा आहे. आम्ही राजकारणात हिशेब करण्यासाठी नाही आलो, मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत, असे सांगून त्या म्हणाल्या, 55 वर्षे लोकांनी शरद पवार यांना आशीर्वाद दिले आहेत. लोक त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांचे उत्तर हे जनतेचे शरद पवार यांच्यावरील प्रेम हेच आहे, असे त्यांनी सुनावले.

- Advertisement -

हेही वाचा – Womens Day : राज्याचे चौथे महिला धोरण आजपासून होणार लागू; वाचा काय आहे वैशिष्ट्य?

अमित शहा यांचे आभार

खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे आभारही मानले. अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात आमच्यावर परिवारवादाबद्दल आरोप केला, पण भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केला नाही. आतापर्यंत अमित शहा महाराष्ट्रात यायचे तेव्हा एनसीपीचा उल्लेख ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असा करायचे, पण यावेळी भ्रष्टाचाराचा एक शब्दही काढला नाही, याबद्दल अमित शहा यांचे मन:पूर्वक आभार मानते, असा टोला त्यांनी लगावला.

परिवारवादाबद्दल बोलायचे झाले तर, मी परिवारवाद आहे ना! डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो तर, आम्ही लोकांकडे जाऊन मते मागितली तर त्यात गैर काय? काम करण्यासाठी मी लायक आहे की नाही, हे महाराष्ट्रातील, बारामतीतील जनता ठरवेल, असे त्या म्हणाल्या. भारतीय जनता पक्षात अनेक ‘परिवारवाद’ आहेत. एक बोट जर तुम्ही माझ्याकडे दाखवत असाल तर, तीन बोटे तुमच्या दिशेने असतात, असे अमित शहा यांनीच एकदा संसदेत भाषण करताना म्हटले होते, याचे स्मरण करून देत सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना कोपरखळीही दिली.

हेही वाचा – PM Modi on Lalu Prasad Yadav : ‘हा देशच माझे…’, लालूंच्या कुटुंबावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -