घरताज्या घडामोडीशिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरीला, बुलढाण्यात पोलिसांत तक्रार दाखल

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरीला, बुलढाण्यात पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून संतप्त प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरीला गेल्यानंतर बुलढाण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चोरीला गेलेले शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शोधून न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

हिंदूहृदयसम्राट शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. मात्र, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला हाताशी धरुन शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाची चोरी केली आहे. आमचे चोरीला गेलेले चिन्ह आणि पक्षाचे नाव शोधून द्यावे, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

दोन्ही गटांनी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह आपणास मिळावे यासाठी आयोगाकडे युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे स्पष्ट केले. ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची आग्रही मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -