घरमहाराष्ट्रशिवसेनेतील महिला नेता एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर? म्हणाल्या सुषमा अंधारेंना...,

शिवसेनेतील महिला नेता एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर? म्हणाल्या सुषमा अंधारेंना…,

Subscribe

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर  त्यांची हरएकतर्हेची मनधरणी करणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद सध्या एकनाथ शिंदे यांच्याच गटात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. दिपाली सय्यद या शिवसेनेतील महिला नेत्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठाकरे गटात यावं याकरता त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, मधल्या काही काळात दिपाली सय्यद यांचं नाव गुडूप झालं होतं. परंतु, एका मराठी वृत्त वाहिनीला आज दिलेल्या मुलाखतीत त्यांचं एक वक्तव्य चांगलंच सूचक ठरलं असून त्याही शिंदे गटात जातात की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा -माजी आमदाराच्या मुलाने मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन; भाजपाला धुळ्यात धक्का

- Advertisement -

तुम्ही कोणत्या गटात आहात असा प्रश्न विचारल्या मी सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. “मी राजकारणात येण्याच्या आधीपासूनच समाजकारण करत होते. राजकारणात आल्यानंतरही मी माझं काम सुरू ठेवलं. आता राजकारण एका वेगळ्या पातळीवर पोहोचलं आहे. त्यामुळे माझी काही समाजकारणातील रखडलेली कामं होती, जी झाली नव्हती, ती कामं मी करून घेतली. मी सातत्यानं पुरुषांप्रमाणेच महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा महिलांसाठीही भरवण्यात यावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासंदर्भात माझं काम सुरू आहे. एवढंच आहे की, मी स्क्रिनवर येऊन तू तू मै मै करत नाही आहे. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली. तेव्हा नक्कीच अंगावर मी सगळ्या गोष्टी घेतल्या”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

हेही वाचा – शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर; नाराज आमदारांना यावेळी तरी संधी मिळणार?

- Advertisement -

सुषमा अंधारेंना स्वतःला प्रुव्ह करायचं आहे

आम्ही मागे आहोत असं म्हणणं चुकीचं आहे. इतकी वर्ष आम्ही कामं करतोय. मी महाराष्ट्रभर कामं केली आहेत. सुषमा अंधारे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना प्रूव्ह करायचंय की, माझं एक अस्तित्व आहे. मला आता शिवसेनेत साडेतीन वर्ष झाली आहेत. शिवसेनेत काम करते, त्यामुळे गरजेचं नाही की, स्क्रिनवर प्रत्येक वेळी येऊन टीका टिपणी करावी आणि टीका-टीप्पणी केल्यावरच तुम्ही राजकारणात सक्रिय असता, असं म्हणणं चुकीचं आहे.” असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -