घरक्राइमघरात फटाक्याचा साठा करणार्‍या विक्रेत्यांवर पोलिसांचा राहणार ‘वॉच'

घरात फटाक्याचा साठा करणार्‍या विक्रेत्यांवर पोलिसांचा राहणार ‘वॉच’

Subscribe

नाशिक : शहरात काही विक्रेते फटाक्यांचा घरात साठा करून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. काही विक्रेते सोशल मीडियावरून जाहिरात करून फटाके विक्री करीत आहेत. त्यातून दुर्घटना घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती नाशिक शहर विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी दिली.

दिवाळीत फटाक्यांमुळे होणार्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन इन मोडवर आले आहेत. शहरात फटाके विक्री करणार्‍यांसाठी नियमावली असून नियमांचे पालन करून फटाके विक्री करावी, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांना कारावास, आर्थिक दंडाची तरतुदही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घरात फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणार्‍यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दिवाळीत वायू प्रदुषण होऊ नये, फटाके विक्री करताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी नाशिक महापालिका व शहर पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केली असून, त्या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे महापालिका, अग्निशमन विभाग, महावितरण, पोलिस विभागांची परवानगीही घेणे विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे विक्रेत्यांना नियमांची पुर्तता करूनच फटाके विक्री करावी लागणार आहे.

फटाके विक्री व वापराची नियमावली
  • फटाके फोडण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी.
  • साखळी फटाक्यांच्या आवाजात ११५ डेसीबलपर्यंत मर्यादा असावी.
  • न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजेनंतर फटाके फोडण्यास परवानगी नसेल.
  • फटाक्यांची दुकाने जमिनीलगतच असावी. परवाना प्राप्त स्टॉलमध्ये १०० किलो फटाके व ५०० किलोग्रॅमपर्यंत शोभेच्या फटाक्यांचा साठा ठेवता येणार आहे.
  • प्रत्येक स्टॉलमध्ये तीन मीटरपेक्षा अंतर कमी नसावे.
  • फटाक्यांच्या दुकानात आपत्कालीन मार्ग खुला ठेवावा. या परिसरात धुम्रपान निषेध असेल.
    खराब प्रतीचे फटाके विक्री करू नये.
  • २५ ग्रॅमपेक्षा जड आणि ३.८ सेमीपेक्षा जास्त लांबीचे ऍटमबॉम्ब व क्लोरटचा समावेश असलेली फटाके विक्री करू नयेे.
  • गनपावडर व नायट्रेटमिश्रित मात्र क्लोरेट नसलेल्या चिनी फटाक्यांची विक्री करू नये
  • फुटफुटी किंवा तडतडी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय हे फटाके पिवळा फॉस्फरसयुक्त अंत्यत विषारी फटाके असल्याने त्यांची विक्री करू नये.
  • शांतता क्षेत्रात फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
  • रॉकेटच्या डोक्याचा भाग १० सेमीपेक्षा लांब नको आणि २.५ सेमी पेक्षा जास्त जाडीचा नसावा.
  • आपटबार व उखळी दारु उडवण्यास बंदी असून परदेशी फटाके विक्री आणि बाळगण्यासही बंदी आहे.
  • १० हजार पेक्षा जास्त लांबीच्या फटाक्यांच्या माळीवर बंदी आहे.
  • अल्पवयीन मुलामुलींना पालक असल्याशिवाय फटाके देवू नये.
  • आदेशांचा भंग केल्यास आठ दिवसांपर्यंत कारावास किंवा एक हजार २५० रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -