घरमहाराष्ट्रनाशिकगुन्हे अन्वेषण विद्यालयातील पोलिस प्रशिक्षणार्थींना रस्ता सुरक्षेचे धडे

गुन्हे अन्वेषण विद्यालयातील पोलिस प्रशिक्षणार्थींना रस्ता सुरक्षेचे धडे

Subscribe

नाशिक फर्स्टतर्फे ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये उपक्रम

नाशिक : नाशिक फर्स्ट तर्फे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधुन गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात विशेष प्रशिक्षणासाठी आलेल्या वाहतुक पोलिसांना रस्ता वाहतुक सुरक्षा जागृती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

नाशिक फर्स्ट या संस्थेमार्फत ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाहतुकीचे नियमाबाबत माहिती देऊन उद्याचे आदर्श चालक निर्माण करण्याचे काम केले जात आहे. तसेच नाशिक फर्स्ट गेल्या १० वर्षापासुन हे रस्ता सुरक्षेचे काम अविरतपणे करीत आहे, असे यावेळी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय (डीटीएस) येथे प्रशिक्षणासाठी आलेले २९६ वाहतूक पोलीस सहभागी झाले होते.

- Advertisement -
आजवर पाऊणेदोन लाख लोकांना प्रशिक्षण

नाशिक फर्स्टतर्फे आजपर्यंत ३ हजार ४२० सत्रांमधून १ लाख ७६ हजार २८ प्रशिक्षणार्थींना रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात आरटीओकडून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढणार्‍या ४८ हजार ५०२ प्रशिक्षणार्थिंना ८७० सत्रांमधुन प्रशिक्षण देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -