घरमहाराष्ट्रShivjayanti 2023 : मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये गुंजणार जय जय शिवराय आरतीचा जयघोष

Shivjayanti 2023 : मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये गुंजणार जय जय शिवराय आरतीचा जयघोष

Subscribe

Shivjayanti 2023 | मुंबई भाजपातर्फे मुंबईत साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमाची माहिती आज मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळयात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले.

Shivjayanti 2023 | मुंबई – हिंदवी स्वराजाचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला मुंबईत भाजपातर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

मुंबई भाजपातर्फे मुंबईत साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमाची माहिती आज मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळयात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले.

- Advertisement -

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी उत्सव जोरदार साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे आता ‍छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठ्या उत्साहात मुंबईत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ‍ठिकाणी जय जय शिवराया… या वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष करुन सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून त्याची माहिती ही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, अशी माहिती आमदार अँड शेलार यांनी दिली.

- Advertisement -

उत्तर पश्चिम जिल्हात 58, उत्तर पूर्व 50, उत्तर मध्य 63, उत्तर मुंबई 69, दक्षिण मध्य 44, दक्षिण मुंबई 62 असे एकुण 346 ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम साजरा होणार आहे. यातील 36 ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वरळी नाका, माटुंगा स्टेशन, शिवाजी पार्क, राम नगर-मालाड (प), भायखळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, दहिसर, आनंद नगर, शहाजीराजे क्रीडांगण-मालाड, लोखंडवाला-कांदिवली, खार (प) या ठिकाणांचा समावेश आहे. अशी माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.


आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव

मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल आमदार ॲड आशिष शेलार यांनी केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले. मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. या ‘दिवाण-ए- आम’ मध्ये यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. या निमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -