घरताज्या घडामोडीपुणे महापालिका मुख्यालयात मला मारण्याचा हेतू होता, सोमय्यांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप

पुणे महापालिका मुख्यालयात मला मारण्याचा हेतू होता, सोमय्यांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप

Subscribe

सोमय्या यांनी एक दगड फेक करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असं दगडफेकीवरुन किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

पुणे महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ५ फेब्रुवारीला किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी जात असताना सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या वेळी सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले त्यांच्या हाताला आणि कंबरेला मुका मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान तो मला मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप सोमय्यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच हल्ला करणाऱ्या त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावे अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि पालिकेत निवेदन देण्यासाठी सोमय्या पुणे महानगरपालिकेत गेले होते. यावेळी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सोमय्यांच्या गाडीच्या दिशेने काहीजणांनी दगडफेक केली आहे. सोमय्या यांनी एक दगड फेक करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असं दगडफेकीवरुन किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

पुण्यात गाडी अडवण्याचा प्रयत्न आणि शिवसैनिकांच्या हल्ल्याचा व्हिडीओ भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे. तसेच या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये सोमय्या म्हणाले की, शिवसेनेचा हेतू 5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा, “मोठा दगड” आणि… अशा आशयाचे ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

- Advertisement -

सोमय्यांची ८ शिवसैनिकांच्या अटकेची मागणी

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला यानंतर सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुका मार लागला असल्याची माहिती दिली आहे. सोमय्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर त्यांनी पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.


हेही : Nitesh rane : नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढणार, मंगळवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -