घरताज्या घडामोडी'धनुष्यबाण' चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेतील या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर शुक्रवार केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेतील या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर शुक्रवार केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे. (shivsena symbol eknath shinde uddhav thackeray claims for partys bow and arrow poll symbol)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेला निवडणूक आयोगापुढे आव्हान देत शिवसेना चिन्ह्याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. तसेच, हे चिन्ह आम्हाला प्रदान करावे किंवा तात्काळ गोठवावे अशीही अप्रत्यक्ष मागणी केल्याचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

- Advertisement -

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रार करण्यात आल्याचे समजते. धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या चिन्हाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट शुक्रवारी निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर हक्क सांगण्यासाठी शिवसेना आज प्रतिज्ञापत्रे व पुरवणी कागदपत्रे निवडणूक आयोगापुढे सादर करणार आहे. ठाकरे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. आयोगाने ठाकरे गटाला 23 सप्टेंबरपर्यंत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे व इतर संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते.


हेही वाचा – पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून पदाधिकाऱ्यांची बैठक, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -