घरदेश-विदेशकर्नाटकातील मशिदीत घुसून पूजा केल्याने मुस्लीम संघटना आक्रमक; संबंधितांच्या अटकेची मागणी

कर्नाटकातील मशिदीत घुसून पूजा केल्याने मुस्लीम संघटना आक्रमक; संबंधितांच्या अटकेची मागणी

Subscribe

दरम्यान 1460 मध्ये बांधलेला बीदरमधील महमूद गवा हा मदरसा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येतो. त्याची वारसा रचना देखील देशातील महत्वाच्या स्मारकांच्या यादीत आहे. बुधवारी सायंकाळी जमावाने मदरशाचे कुलूप तोडल्याचे पोलिसांनी

दसऱ्या निमित्त असलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या जमावाने कर्नाटक(karnataka) मधील बिदर जिल्ह्यात असलेल्या एका ऐतिहासिक मशिदीत बळजबरी घुसून पूजा केली. त्याचबरोबर मदरशाची तोडफोड करून घोषणाबाजी करण्यात आली. या संदर्भांत पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हासुद्धा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान सांबांधीत व्यक्तींना अटक झाली नाही तर आंदोलन करणायचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला आहे. दरम्यान 1460 मध्ये बांधलेला बीदरमधील (bidar) महमूद गवा हा मदरसा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येतो. त्याची वारसा रचना देखील देशातील महत्वाच्या स्मारकांच्या यादीत आहे. बुधवारी सायंकाळी जमावाने मदरशाचे कुलूप तोडल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा – राहुल गांधींनी बांधली सोनिया गांधींच्या बुटाची लेस अन् अनेकांना आठवण झाली ‘त्या’ प्रसंगाची

- Advertisement -

दरम्यान या जमावाने मदरशाच्या पायऱ्यांवर उभे राहून पूजा करण्यासाठी वळण्यापूर्वी “जय श्री राम” आणि “हिंदू धर्म जय” अश्या घोषणा सुद्धा दिल्या. दरम्यान याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये पायऱ्यांवर उभा असलेला माणसांचा जमाव मशिदीच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप त्यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

हे ही वाचा – राष्ट्रपती मुर्मूंबद्दल काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाकडून दखल

कर्नाटक राज्यातील बिदरमध्ये अनेक मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून संबंधित दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारी नमाज पाडल्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी या घटनेवर राज्यातील सत्ताधारी भाजपला फटकारले आहे आणि ”मुस्लिमांना कमी लेखण्यासाठी भाजप अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे”. असा आरोपसुद्धा ओवैसी यांनी केला.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -