घरक्राइमशिवशाही पुन्हा आगीच्या भक्षस्थानी; 'म्हणून' वाचले प्रवाश्यांचे प्राण

शिवशाही पुन्हा आगीच्या भक्षस्थानी; ‘म्हणून’ वाचले प्रवाश्यांचे प्राण

Subscribe

नाशिक : सोमवारी (दी.१) पुण्यात शिवशाही बस पेटल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दी.२) पुन्हा नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील माळवाडी शिवारात भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मागून येणार्‍या कारचालकाने बसचालकाला वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बसचालकाने तातडीने बस रस्त्याच्या थांबवत सर्व प्रवाश्यांना सूचित करून खाली उतवले. बसने पेट घेतला त्यावेळी बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते.

पिंपरी चिंचवड आगरची शिवशाही बस सकाळी ७च्या सुमारास नाशिक मधील नवे मध्यवर्ती बसस्थानक ठक्कर बाजार येथून पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील माळवाडी शिवारात बस आल्यानंतर बसची गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (वय ४१) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हळूहळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकानेही पाठीमागून बस पेटल्याचे बस चालकाला सांगितले. बस चालकाने तत्काळ सर्व प्रवाश्यांना खाली उतरवले. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे बस मधील ४३ प्रवाश्यांचे प्राण बालबाल बचावले.

- Advertisement -

इंजिन मध्ये दोष ?

सोमवारी  पुण्यात शिवशाही बसने अचानक पेट घेतला होता. तेव्हादेखील चालकाच्या प्रसंगावधामुळे बसमधील सर्व ४२ प्रवासी थोडक्यात बचावले होते. पुण्यात पेट घेतलेल्या बसचे इंजिन सातत्याने गरम होत होते. त्यामुळे यवतमाळमधून बस सावकाश पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होती. परंतु पुण्यातील येरवडामध्ये आल्यावर बसने पेट घेतला. आजदेखील इंजिन गरम झाल्यामुळे तर ही दुर्घटना झाली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बसची झाली राख

प्रवासी सुखरूप खाली उतरल्यानंतर त्यांना तातडीने रस्त्याच्या बाजूला सुरक्षित स्थळी उभे करण्यात आले. दरम्यानच्या, काळात बसने पेट घेतल्याने आगीचे आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. आगीमुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक राजकुमार तडवी, हवालदार प्रवीण गुंजाळ व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रारंभीचा अर्धा तास एका बाजूने आणि तासाभरानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सिन्नर नगरपालिकेच्या दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -