घरक्राइमधक्कादायक ! अघोरी विद्येने घेतला आदिवासी युवकाचा बळी बागलाण तालुक्यातील घटना

धक्कादायक ! अघोरी विद्येने घेतला आदिवासी युवकाचा बळी बागलाण तालुक्यातील घटना

Subscribe

नाशिक : आलियाबाद (ता. बागलाण) येथे एका भोंदूबाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली पिंपळकोठे येथील आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रवीण गुलचंद सोनवणे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुळशीराम सोनवणे असे संशयित भोंदूबाबाचे नाव आहे.

पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे याची तब्येत बरी नसल्यामुळे आलियाबाद येथील भोंदूबाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. भोंदूबाबाचेही पिंपळकोठे येथे सोनवणे यांच्या घरी येणे-जाणे होते. सात दिवसापूर्वी सोनवणे हा आलियाबाद येथे उपचारासाठी गेला होता. पण बाबाने अघोरीपणा करून सोनवणे याचा जीव घेतल्याने त्याला त्याच घरात टाकून बाहेर निघून गेला होता. सोनवणे घरी न आल्याने त्याचे नातेवाईक शोधू घेवू लागले. नातेवाईकांनी भोंदूबाबास कॉल केला. त्यावेळी त्याने प्रवीण बाहेर गेला आहे, झोपला आहे, अशी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

- Advertisement -

प्रवीण सोनवणे याचे घर आदिवासी वस्तीवर निर्जनस्थळी असल्याने आणि काही ग्रामस्थ बाहेरगावी कामाला गेल्याने त्याच्या घराजवळ कोणाचेही येणे-जाणे नव्हते. दरम्यान, गावातील महिला भिमाबाई सोनवणे व मोतीराम सोनवणे यांना भोंदूबाबा सोनवणे यांच्या घराजवळ निळ्या रंगाच्या माशा मोठ्या प्रमाणात दिसल्याने संशय आला. त्यांनी पोलीस पाटील शिवाजी जगताप यांना माहिती दिली. जगताप यांनी जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट, सहाय्यक अधिकारी संजय वाघमारे यांनी घटनास्थळी पाहणी करून प्रवीण सोनवणे याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. साल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आवारी यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.

मृत प्रवीण सोनवणे याचा मृत्यू कसा झाला. त्याच्या मृत्यू कशा पद्धतीने झाला हे शिवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.असे वाघमारे यांनी सांगितले. शनिवारी (दि.१५) मृत प्रवीण सोनवणे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी पिंपळकोठे येथे दफनविधी केला. भोंदूबाबा व त्याचा साथीदार फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -