घरCORONA UPDATEअजय देवगण पोलिसांना म्हणतो, तुम्ही आवाज द्या, सिंघम तुमच्याबरोबर असेल

अजय देवगण पोलिसांना म्हणतो, तुम्ही आवाज द्या, सिंघम तुमच्याबरोबर असेल

Subscribe

अजय देवगणने मुंबई पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी डॉक्टर आणि पोलिस सातत्याने आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. दरम्यान, बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण याने ट्विट केलं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अजय देवगणने मुंबई पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अजय देवगण म्हणाला की कोविड -१९ रोगाच्या पार्श्वभूमीवर आपलं योगदान अतुलनीय आहे. यासह अजय देवगण म्हणाला की जेव्हा तुम्ही आवाज द्याल, सिंघम आपली खाकी घालून तुमच्याबरोबर उभा असेल. तथापि अजय देवगन व्यतिरिक्त आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर या कलाकारांनीही मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे.

अजय देवगण यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांचं कौतुक करताना लिहिलं की, “प्रिय मुंबई पोलिसांनो, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस म्हणून ओळखले जाता. कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर आपलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही आवाज दिला तर, सिंघम आपली खाकी वर्दी घालून तुमच्याबरोबर उभा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.” अजय देवगणच्या या ट्विटबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अजय देवगणने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. दरम्यान, अजय देवगणचा तन्हाजी चित्रपट चांगलाच गाजला. तन्हाजीच्या अपार यशानंतर अजय देवगन लवकरच मैदान, सूर्यवंशी, भुज आणि आरएआर चित्रपटात दिसणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -