घरमहाराष्ट्रसूरज परमारच्या डायरीची एसआयटी चौकशी करा, संजय राऊतांची मागणी

सूरज परमारच्या डायरीची एसआयटी चौकशी करा, संजय राऊतांची मागणी

Subscribe

मुंबई – राज्यात एसआयटीच्या चौकशांची मागणी वाढलेली असताना आता संजय राऊत यांनी सूरज परमार प्रकरणातही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमारच्या डायरीवर एसआयटी स्थापन झाली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. कुठलेही सरकार इतक्या सूडबुद्धीने वागले नाही. या प्रकरणात भाजपाला जे हवे तेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. मंत्र्यांविरोधात SIT स्थापन करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -


ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी तपासात जी डायरी सापडली आहे त्यात काही सांकेतिक नावं आहेत. ती कुणाची आहेत, आम्हाला माहिती आहे. त्यावर एसआयटी लावा. सगळ्यात आधी राज्यपालांनी छत्रपतींचा अपमान केलाय त्याची चौकशी करा, अशी मागणी राऊतांनी केली.


सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. हे सरकार खोके गोळा करण्यासाठी आलेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार स्थापन झालं नाही. शिवसेना फोडायची. संपवायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान नष्ट करायचा यासाठी हे सरकार आलंय, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा रात्री-अपरात्रीचा प्रवास टाळायला हवा, पण…; गोरे यांच्या अपघातानंतर शरद पवारांचं वक्तव्य

अनेक विषय आहेत. विरोधी पक्षांवर एसआयटी स्थापन केली जाते. दिशा सालियानच्या आई वडिलांना माध्यमांसमोर बोलू दिलं जात नाही. ही दडपशाही आहे. त्यांच्यामागे ईडी-सीबीआयही लावतील. तिच्या आई वडिलांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे फडणवीस यांचे हायकमांड दिल्लीला आहे. त्यांना वारंवार तिथे जावं लागते असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -