घरमहाराष्ट्ररात्री-अपरात्रीचा प्रवास टाळायला हवा, पण...; गोरे यांच्या अपघातानंतर शरद पवारांचं वक्तव्य

रात्री-अपरात्रीचा प्रवास टाळायला हवा, पण…; गोरे यांच्या अपघातानंतर शरद पवारांचं वक्तव्य

Subscribe

गोरे यांची गाडी पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून जात होती, यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल 30 फूट दरीत कोसळली. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.

मुंबई – भाजपाचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला काल पहाटे अपघात झाला. या अपघातात ते बचावले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या अपघाताबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, असं ते म्हणाले.

“रात्री-अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, गोरे यांच्यासह चौघे जखमी

गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गोरे यांची गाडी पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून जात होती, यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल 30 फूट दरीत कोसळली. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.

- Advertisement -

या गाडीतून गोरे यांच्यासह एकूण 4 जण प्रवास करत होते. यातील गोरे आणि त्यांच्या सहकार्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र दोघांची प्रकृती गंभीर आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा राहुल गांधींनी मीडिया जोडो यात्रा सुरू करावी, भाजपाचे ‘भारत जोडो’वर पुन्हा टीकास्त्र

घातपाताचा संशय

जयकुमार गोरे यांचा अपघात नसून घातपात आहे, असा संशय त्यांच्या वडिलांनी उपस्थित केला होता. मात्र, हा घातपात नसून अपघातच आहे असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. बोलण्याच्या ओघात किंवा अनावधानानं त्यांच्या चालकाकडून चूक घडली असेल पण असं काहीही नाही. ते स्वतः झोपेत असतानाच हा अपघात घडला, पण आता त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -