घरताज्या घडामोडीसरचिटणीस पदासाठी धिम्या गतीने मतमोजणी

सरचिटणीस पदासाठी धिम्या गतीने मतमोजणी

Subscribe

उत्सुकता शिगेला, तिसर्‍या फेरीअंती अ‍ॅड. ठाकरे आघाडीवर

मविप्र निवडणुकीत प्रगती आणि परिवर्तन या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. मात्र रात्री दहा वाजेपर्यंत सरचिटणीसपदासाठी तिसरी फेरी सुरू होती. तर इतर पदांसाठी पाचव्या फेरीची मतमोजणी सुरू होती.

गेल्या महिनाभरापासून मविप्र निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडाला. या निवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यातही सरचिटणीसपदासाठी कोण बाजी मारणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. प्रगती पॅनलच्या सरचिटणीस पदाच्या उमेदवार निलीमा पवार तर परिवर्तन पॅनलचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यात चुरस दिसून आली. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. सर्व मतपत्रिका एकत्रित केल्यानंतर त्याचे वेगवेगळे गठठे तयार करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. सायंकाळी सर्वच पदांसाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सरचिटणीस वगळता इतर पदांच्या मतमोजणीची पाचवी फेरी सुरू असतांना सरचिटणीस पदासाठी मात्र तिसरी फेरी सुरू होती. प्रत्येक फेरीनंतर प्रगती पॅनलकडून फेरमतमोजणीची मागणी होत असल्याने ताकही फुंकुन पिण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा सभासदांमध्ये रंगली होती. त्यामुळे क्षणाक्षणाला निवडणूक निकालाविषयी उत्सुकता वाढत चालली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -