घरमहाराष्ट्र...तर आम्ही तुरुंगात जाण्यास तयार, प्रवीण दरेकर संतापले

…तर आम्ही तुरुंगात जाण्यास तयार, प्रवीण दरेकर संतापले

Subscribe

मुंबै बँक प्रकरणात मनीषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. त्यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच संतापले. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबै बँकेच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा मांडला.

मुंबईः कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी विधान परिषदेत आज प्रवीण दरेकर आणि मनीषा कायंदे यांच्यात वाद झाला. त्यावेळी प्रवीण दरेकर बोलत होते.

मुंबै बँक प्रकरणात मनीषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. त्यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच संतापले. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबै बँकेच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर जोरदार दिलं. विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे. कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ. आमच्यासोबत महाराष्ट्रातील लोक तुरुंगात जातील. पण, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर बोलणं उचित नाही, असंही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या होत्या की, ‘मुंबै बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनं अहवाल दिला आहे. या अहवालात म्हटलंय की, मुंबै बँकेला बरखास्त करा आणि प्रशासक नेमा. यावरून मुंबै बँकेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा,’ अशी मागणी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात केली. त्याच्या उत्तरादाखल ‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ. विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे,’ असं म्हणत प्रवीण दरेकरांना मनीषा कायंदेंवर प्रतिहल्ला चढवला.


हेही वाचाः पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्त; अहवाल सादर करण्याचे आदेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -