घरताज्या घडामोडीनंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत आदित्य ठाकरेंना विचारा, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत आदित्य ठाकरेंना विचारा, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईत श्रीधर पाटणकर यांचा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाटणकर यांच्या कंपनीत ३० कोटी रुपये शेल कंपन्यांच्यामार्फत गुंतवले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही नंदकिशोर चतुर्वेदी यांचा संबंध आहे. ईडीच्या कारवाईनतंर नंदकिशोर चतुर्वेदी फरार आहेत. यामुळे ते कुठे आहेत याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला पाहिजे असे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नंदकिशोर चतुर्वेदी हे ईडीच्या कारवाईनंतर फरार असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. यंत्रणांनी नंदकिशोर चतुर्वेदी फरार असल्याचे घोषित केलं आहे. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी चतुर्वेदी कुठे आहेत याबाबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले पाहिजे असे विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नंद किशोरी चतुर्वेदी कुठे आहेत? हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारा असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी हवाला एन्ट्री ऑपरेटर हे आदित्य ठाकरेंचे व्यावसायिक पार्टनर आहेत. आदित्य ठाकरेची वत्सला ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, प्राईम टॅक्स ट्रेडिंग प्रा.लि. आणखी एका कंपनीत चतुर्वेदी भागीदार आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१० ते २०१५ या कालावधीत कंपन्या बनवल्या आणि या नंतर नंदकिशोर चतुर्वेदी यांनी घेतल्या आहेत. बहुतेक मातोश्री किंवा वर्षामध्ये त्यांना लपवलं असेल.

कर्जतमधील वैजनाथ हिंदू देवस्थान, पेशव्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सव्वा तीनशे वर्ष जुनी जमीन पाटणकरांनी मुस्लिमच्या नावे घेऊन काबीज केली. अशा पाटणकरच्या नावे अनेक मालमत्ता आहेत. आदित्य ठाकरेंनी बोगस कंपन्या करायच्या, नंदकिशोरद्वारे पैसे घ्यायचे. पाटणकर यांचे ठाकरे कुटुंबीयांसोबत बिझनेस पार्टनर आहेत. पाणकरांनी काळे पैसे पांढरे करुन दिले आहेत. हळूहळू हे सगळं बाहेर येईल असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्त; अहवाल सादर करण्याचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -