घरमहाराष्ट्रसोलापुरात चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक करण्याचा प्रयत्न; भीम आर्मीचा पदाधिकारी ताब्यात

सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक करण्याचा प्रयत्न; भीम आर्मीचा पदाधिकारी ताब्यात

Subscribe

सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तसंच, या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजीदेखील केली. या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सोलापूर: सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तसंच, या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजीदेखील केली. या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अजय असं या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगितलं जात आहे. (Solapur Another attempt to blackmail Chandrakant Patil in Solapur Officials of Bhim Army detained)

चंद्रकांत पाटील हे पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर यावेळी कंत्राटी भरती विरोधात या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजीदेखील केली, तर काळे झेडे दाखवण्याचादेखील प्रयत्न केला.

- Advertisement -

याआधीही झाली होती शाईफेक

याआधी पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं होतं. तर ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला होता भंडारा 

काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शासकीय विश्रामगृहामध्ये भंडारा उधळण्यात आला होता. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून हा भंडारा विखे पाटलांवर उधळला गेला होता. तर विखे पाटलांवर ज्याने भंडारा उधळला होता, त्या शेखर भंगाळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

- Advertisement -

राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेला राज्यभरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच विरोध करत या पदाधिकाऱ्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा: Shiv sena Expands Executive Committee: ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार; तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -