घरमहाराष्ट्रपरराज्यातून ट्रेनने महाराष्ट्रात येणाऱ्यांना RT-PCR चाचणी निगेटिव्ह बंधनकारक

परराज्यातून ट्रेनने महाराष्ट्रात येणाऱ्यांना RT-PCR चाचणी निगेटिव्ह बंधनकारक

Subscribe

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्या-राज्यात तसंच आंतरजिल्हा प्रवास करायला परवानगी आहे. मात्र, आता राज्य सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग करणं अनिवार्य करण्यात आलं असून केवळ कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. हे आदेश कालपासून कोरोनाचे संकट असेपर्यंत लागू राहणार आहेत.

परराज्यातून ट्रेनने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रवासी ज्या जिल्ह्यात जाणार आहे, तिथल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसंच ट्रेनची तपशीलवार माहिती देखील देण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांची रेल्वेने प्रत्येक स्थानकात घोषणा करणं आवश्यक आहे. तसंच आवश्यक नियमांची माहिती असलेली छापील पत्रके देखील प्रवाशांना देणं आवश्यक असल्याचं आदेशात म्हटलं आहे.

- Advertisement -

नव्या नियमावलीतील सूचना

  • सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकार असणार.
  • सर्व प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना अथवा उतरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
  • प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणं बंधनकारक असणार आहे.
  • गर्दी होऊ नये यासाठी थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांनी ट्रेनच्या वेळेआधी स्थानकात येणं अपेक्षित आहे.
  • ई-तिकिटे आणि मोबाईल तिकिटांचा जास्तीत जास्त वापर करावा.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -