घरमहाराष्ट्रST Workers Strike : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकावले! आंदोलकांनी CSMT...

ST Workers Strike : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकावले! आंदोलकांनी CSMT स्थानकात मांडला ठिय्या

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या साडे पाच महिन्यांपासून सुरु असलेला संप न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी मिटेल अशी आशा होती. मात्र आझाद मैदानावर संपासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. या आंदोलनानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. यानंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठत तिथेच ठिय्या मांडला आहे.

आमच्या पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज केला, आमच्यावर अन्याय झाला, बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाही, रेल्वे स्थानतातून हुसकावून लावत आहेत. त्यामुळे आम्ही करणार काय त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून राहण्याचा पवित्रा आता एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

गुणरत्न सदावर्ते यांना अटक

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ल्या केल्याप्रकरणी आणि आंदोलकांना भडकवल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड सदावर्ते गुणरत्न यांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास जे.जे रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमासमोर जाण्यासही रोखले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी संपात व्यक्त केला आहे. दरम्यान आज सकाळी अकरा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे. तसेच माझ्या आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हणत शरद पवार यांच्या दहशतीला आम्ही घाबरणार नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

नेमकं घडलं काय? 

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आज दुपारी साडे तीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली. मग मुंबई पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणास विरोध केल्याचे म्हणत या एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -