घरमहाराष्ट्र१० वी, १२ वी च्या परीक्षांमधील अपयशी विद्यार्थ्यांसाठी नवं वेळापत्रक जारी

१० वी, १२ वी च्या परीक्षांमधील अपयशी विद्यार्थ्यांसाठी नवं वेळापत्रक जारी

Subscribe

या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

महाराष्ट्र राज्य महामंडळाने दहावी आणि बारावीचा निकाल जारी करण्यात आला, ज्यात अनेक विद्यार्थ्यांना अपयश आले. त्यामुळे पुरवणी परीक्षांमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षेत अनुर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना खचून जाण्याची गरज नाही कारण त्यांना ही पुन्हा एक संधी आहे. या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बारावीची पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत होणार आहे. तर दहावीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत होईल, या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

वर्षा गायकवाड यांचं ट्विट नेमक काय?

राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी आम्ही जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावे.

- Advertisement -

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वीच्या सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची लेखी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट तर व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 21 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर इ.१०वीची लेखी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होईल.

तसेच इ. 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 8 ऑगस्ट आणि इ. 10 वीच्या परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी http://mahahsscboard.in वर संपर्क साधावा. या परीक्षांसाठी इ.10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 20 जून पासून सुरू होईल, तर इ.12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू आहे.


सदाभाऊ खोतांचा जीव धोक्यात; केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -