घरदेश-विदेशवीज कंपनीची सेवा आवडत नाही का? मग मोबाईल कंपनीप्रमाणे वीज कंपनीही बदलता...

वीज कंपनीची सेवा आवडत नाही का? मग मोबाईल कंपनीप्रमाणे वीज कंपनीही बदलता येणार

Subscribe

ग्राहकांची सोय लक्षात घेऊन आणि वीज कंपनीची मनमानी रोखण्यासाठी सरकार वीज कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी सुविधाही सुरू करणार आहे. यासाठी सरकार सध्या वीज कंपनीच्या पोर्टेबिलिटीचा मसुदा तयार करत आहे.

एखाद्या ग्राहकाला टेलिकॉम कंपनीची (telecom company) सेवा आवडत नसेल, तर तो पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे (portability facility) सहजपणे टेलिकॉम कंपनी बदलू शकतो. त्याचप्रमाणे लवकरच तुम्हाला वीज कंपनीच्या (power company) सेवेतही तुमच्या आवडीनुसार बदल करता येणार आहेत. तुम्ही मोबाईल कंपनी ऑपरेटरप्रमाणेच वीज कंपनी ऑपरेटर बदलू शकाल. यासाठी सरकार लवकरच संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.

पावसाळी अधिवेशनात विधेयक 

- Advertisement -

ग्राहकांची सोय लक्षात घेऊन आणि वीज कंपनीची मनमानी रोखण्यासाठी सरकार वीज कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी सुविधाही सुरू करणार आहे. यासाठी सरकार सध्या वीज कंपनीच्या पोर्टेबिलिटीचा मसुदा तयार करत आहे. नुकतेच केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की, सरकार लवकरच संसदेत वीज (दुरुस्ती) विधेयक-2021 आणण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार हे विधेयक आणू शकते. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. आता ग्राहकांना मोबाईल कंपनीप्रमाणेच वीज कंपनी स्वतः निवडता येणार आहे.

वीज कंपनीत स्पर्धा वाढणार

- Advertisement -

सरकारच्या या विधेयकानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक चांगले पर्याय आणि ऑफर्स मिळतील. या कामासाठी सरकार प्रत्येक वीज आयोगात कायदा सदस्य नियुक्त करेल. याद्वारे ग्राहकांचे आणि कंपनीचे अधिकार आणि नियमांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल.

वीज कंपन्यांना सूचना

देशातील वीजनिर्मितीमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने वीज कंपन्यांना स्वच्छ ऊर्जेच्या स्त्रोताला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. कंपन्यांना पवन ऊर्जेवरील अवलंबित्व वाढवण्यास सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच 5 जलविद्युत प्रकल्प सुरू होणार आहेत, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 30 हजार मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प सुरू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -