घरमहाराष्ट्रराज्य सरकार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ७ अतिरिक्त समित्या स्थापणार

राज्य सरकार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ७ अतिरिक्त समित्या स्थापणार

Subscribe

राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यासाठी पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच लोकायुक्त व उपलोकायुक्त कार्यालयासाठी उपप्रबंधक पदासह एकूण ६ पदांची निर्मिती करण्यासही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी ३ महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. पडसलगीकर यांच्या नियुक्तीमुळे उपलोकायुक्तांची संख्या दोन झाली आहे. या अनुषंगाने लोकायुक्त आण‍ि उपलोकायुक्त कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये उपप्रबंधक या एका पदासह एकूण ६ पदे समाव‍िष्ट आहेत

- Advertisement -

हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –

  1. अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करणार
  2. आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी २५४ अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करण्यास मंजुरी
  3. भिलार येथील पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून सुरू राहणार
  4. लोकायुक्त कार्यालयासाठी उप प्रबंधक पद निर्माण करण्यास मान्यता
  5. गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली ६१ कोटी रक्कम अनुदानात रुपांतरीत करण्यास मान्यता

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -