घरमहाराष्ट्रराज्यात २०१४ सालाऐवढेच मतदान झाले - राज्य निवडणूक आयोग

राज्यात २०१४ सालाऐवढेच मतदान झाले – राज्य निवडणूक आयोग

Subscribe

२०१९ ची निवडणूक लक्षात घेता यावेळी अनेक चांगले उपक्रम हाती घेण्यात आले होते त्याचा चांगला फायदा झाला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आज चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. राज्यामध्ये ५७ टक्के मतदान झाले असल्याचा माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी ही माहिती दिली आहे. या निवडणुकीमध्ये २०१४ प्रमाणेच यावेळी देखील मतदान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यामध्ये मतदान झाले. तर चारही टप्प्यामध्ये एकूण ६०.६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. एकूण८ कोटी ८५ लाख मतदार होते यापैकी ५ कोटी ३७ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कडक उन्हातही लोकांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर शहरी भागामध्ये देखील सुट्ट्यांचे दिवस असताना मतदानाचे प्रमाण चांगले असल्याची माहिती राज्या निवडणूक आयोगाने दिली.

- Advertisement -

राज्यामध्ये माढ, गडचिरोली आणि चिमूरमध्ये सर्वात जास्त मतदान झाले तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाले. २०१९ ची निवडणूक लक्षात घेता यावेळी अनेक चांगले उपक्रम हाती घेण्यात आले होते त्याचा चांगला फायदा झाला. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रात वाढ करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ७ लाख ५० हजार कर्माचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पथकांची नेमणुक करण्यात आली होती. निवडणूक काळात आयकर, पोलिसांनी १५७ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर निवडणूक काळामध्ये १७ हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान. येत्या २३ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -