घरमहाराष्ट्रसांगलीच्या शांतीनिकेत विद्यापीठात सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह

सांगलीच्या शांतीनिकेत विद्यापीठात सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह

Subscribe

वैशालीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास संजयनगर पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या शांतीनिकेतन मुक्त विद्यापीठात धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठ परिसरातील एका वर्गामध्ये एका विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. वैशाली नलवडे असं या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वैशाली या विवाहित असून त्या मुक्त विद्यापीठामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होत्या. मृत तरुणी वैशाली मल्लेवाडी गावची आहे.

संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह

आज मुक्त विद्यापीठाचे वर्ग असल्याने वैशाली कॉलेजला आली होती. मात्र पॉलिटेक्निक इमारतीच्या वर्गात वैशालीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.मृत वैशाली या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. वैशालीच्या मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

संजयनगर पोलिसांकडून तपास सुरु

वैशालीचा मृत्य नेमका कसा झाला. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास संजयनगर पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. वैशालीने आत्महत्या केली या चर्चेला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नसून पोस्टमार्टमनंतर याबाबत खुलासा होईल असे संजयनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

भुज – दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -