घरमहाराष्ट्रमुंबईला 24 ऑक्टोबर 2023पर्यंत पुरेल इतका जलसाठा तलावांत जमा

मुंबईला 24 ऑक्टोबर 2023पर्यंत पुरेल इतका जलसाठा तलावांत जमा

Subscribe

मुंबई : परतीच्या पावसाची अधूनमधून रिमझिम सुरूच आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मिळून एकूण 14,12,134 दशलक्ष लिटर इतका (97.57 टक्के) जलसाठा जमा आहे. मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तलावांत जमा पाणीसाठा हा पुढील 366 दिवस पुरेल इतका म्हणजे 24 ऑक्टोबर 2023पर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईचा कारभार मुंबई महापालिका पाहते. या मुंबईत 60 टक्के झोपड्या आहेत. तर 40 टक्के जागेत श्रीमंत, मध्यम वर्गीय लोक राहतात. आज मुंबईत एका साध्या झोपड्याची किंमत काही लाखांत आहे. एखाद्या इमारतीत, टॉवरमध्ये एक फ्लॅट विकत घ्यायचा तर लाखो रुपये, अगदी घाटकोपरसारख्या विभागात एक दीड कोटींच्या घरात किंमत आहे. मलबार हिल, नेपियंसी रोड, ग्रँट रोड, वरळी, महालक्ष्मी, परळ आदी भागात तर एका फ्लॅटची किंमत काही कोटीत गेली आहे. मुंबई महापालिका या वाढत्या शहराला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवते. अगदी प्रत्येकाचे जीवनमान असलेले पिण्याचे पाणीसुद्धा मुंबई महापालिका स्वस्त दरात पुरवते. मात्र हे पाणी ज्या सात तलावांमधून मुंबईकरांपर्यंत पोहोचते, त्यापैकी मुंबईतील विहार व तुळशी हे अगदीच छोटे तलाव आहेत. मात्र अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा हे पाच प्रमुख तलाव मुंबई हद्दीबाहेर म्हणजे ठाणे जिल्हा परिसरात आहेत. तेथून म्हणजे अंदाजे दीडशे – दोनशे किमी अंतरावरून मुंबईकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अखंडित पुरवठा केला जातो.

- Advertisement -

मुंबईला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा म्हणजे 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा सात तलावांत पावसाळा संपल्यावर 1 ऑक्टोबर रोजी जमा असणे आवश्यक असते. मुंबईकरांच्या सुदैवाने यंदा पावसाळा संपण्याची वेळ निघून गेली असताना अद्यापही अधूनमधून परतीचा पाऊस रिमझिम, कधी मुसळधार स्वरूपात मुंबईत, तलाव परिसरात पडत आहे. त्यामुळे आज 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मिळून एकूण 14 लाख 12 हजार 134 दशलक्ष लिटर इतका (97.57 टक्के) पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा साधारणपणे पुढील 366 दिवस म्हणजे पुढील 24 ऑक्टोबर 2023पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील पावसाळा सुरू होईपर्यंतच काय तर पावसाळा संपेपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावांत जमा आहे. अर्थात पुढील पावसाळा जून महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा तलाव भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकूणच मुंबईकरांना उन्हाळ्यात पाणीकपातीचे टेन्शन घेण्याची गरज पडणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -