घरपालघरसमुद्रकिनार्‍यावरील शंख शिंपल्यातून रोजगार निर्मिती

समुद्रकिनार्‍यावरील शंख शिंपल्यातून रोजगार निर्मिती

Subscribe

यामध्ये अनेक कांदळवणे आहेत. समुद्रातील भरपूर मिळणारे मासे तर आहेतच, पण या सागरी पाण्यात उगवणार्‍या एक पेशी वनस्पती देखील अन्न म्हणून उपयोगात आणता येते.

डहाणू : समुद्रकिनारी मिळणार्‍या औषधी वनस्पती तसेच शंख-शिंपल्यातून नवा रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये अनेक स्थानिक कलाकारांनाही उपजिविकेचा मार्ग सापडला आहे. पालघर जिल्हयातील समुद्रातून मिळणार्‍या संपत्तीतून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्याला १२५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्‍यावर विपुल प्रमाणात मिळणारे मासे त्याचबरोबर समुद्रातून मिळणारे कला कौशल्याने भरलेले शंख शिंपले, विविध आकाराचे रेखाचे दगडांनी रोजगाराची दालने उघडी केली आहेत. समुद्रकिनार्‍यावर विविध आकाराचे, रंगढंगांचे शंख शिंपले, कवड्या आणि औषधी वनस्पती गोळा करून अर्थाजन केले जात आहे. विस्तीर्ण लाभलेल्या सागरी किनार्‍यामुळे जैविक पदार्थ मिळण्याचा हक्क आला आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा मिळाला आह.े यामध्ये अनेक कांदळवणे आहेत. समुद्रातील भरपूर मिळणारे मासे तर आहेतच, पण या सागरी पाण्यात उगवणार्‍या एक पेशी वनस्पती देखील अन्न म्हणून उपयोगात आणता येते.

समुद्रातील अनेक वनस्पती औषध म्हणून कर्करोगावर देखील उपयोग केला जातो.
समुद्र आणि किनारपट्टी हा निसर्गाने आपल्याला दिलेला जैविक खजिना आहे. धनसंपदेबरोबरच मानवाच्या प्रगतीसाठी याचा उपयोग केला तर नक्कीच फायदा होईल. समुद्रकिनार्‍यालगत मिळणारे शंख शिंपले, कवड्या, विविध दगड यावर थोडीशी घासगीस स्वच्छता करून विविध ऍक्रेलिक रंगाने सजवून कलाकार मंडळी यावर पैसे कमवू लागले आहेत. अनेक मोठ्या देवस्थानाजवळ सुद्धा या अनेक कलाकृतीच्या वस्तू भाविक श्रद्धेने विकत घेत आहेत. समुद्रातील संपत्ती हौशी नागरिक खरेदी करून आपल्या घरी शोपीस म्हणून बाळगत आहेत. यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास किनार्‍यावरील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते, असे येथील कलाकारांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -