घरमहाराष्ट्रराणी बागेला दिवाळीत 50 हजार पर्यटकांची भेट; 20 लाखांची कमाई

राणी बागेला दिवाळीत 50 हजार पर्यटकांची भेट; 20 लाखांची कमाई

Subscribe

मुंबई : शाळा, कॉलेजला दिवाळीची सुट्टी पडली आहे. विकेंडला लागून आलेल्या दिवाळीमुळे सरकारी कार्यालये देखील बंद आहेत. त्यामुळे भायखळा येथील राणीच्या बागेत गेल्या शुक्रवारपासून मुंबईकरांसह इतर पर्यटकांची गर्दी लोटली आहे. गेल्या चार दिवसांत जवळजवळ 50 हजार पर्यटकांनी राणीच्या बागेत भेट देऊन मजा लुटली. त्यामुळे राणीच्या बागेला तब्बल 20 लाख रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे.

दिवाळी सणानिमित्ताने मुंबईकर बच्चे कंपनी सुट्टी एन्जॉय करीत आहेत. त्यातच बच्चे कंपनीकडून राणीच्या बागेचा आग्रह धरला जात असल्याने पालक मंडळीही त्यांच्या सोबत राणीच्या बागेची सफर करीत आहेत. बच्चे कंपनी, पर्यटक राणीच्या बागेतील हत्ती, वाघोबा, पेंग्विन, विविध पक्षी आदींसोबत खूपच मजा करीत आहेत.

- Advertisement -

विशेषतः, बच्चे कंपनीला तर पेंग्विन व वाघ बघायला आणि उद्यानात घसरगुंडीवर, झोपाळ्यावर खेळणे खूपच आवडते. राणीच्या बागेत गेल्या शुक्रवारी 3 हजार 48 पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला 1 लाख 53 हजार 250 रुपयांची कमाई झाली. तर, शनिवारी 8 हजार 579 पर्यटकांनी भेट दिली व त्यामुळे 3 लाख 31 हजार 310 रुपये, रविवारी 17 हजार 498 पर्यटकांनी भेट दिली व 6 लाख 55 हजार 675 रुपये एवढी आणि सोमवारी 20 हजार 196 पर्यटकांनी भेट दिली व 7 लाख 91 हजार 650 रुपये एवढी कमाई झाली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत राणीच्या बागेत सुमारे 50 हजार पर्यटकांनी भेट दिली आणि त्यामुळे राणीच्या बागेला तब्बल 20 लाख रुपयांची कमाई झाली.

लवकरच ओदिशातून येणार मगरी
भायखळा येथील राणीच्या बागेत लवकरच ओदिशा, मद्रासच्या मगरी, सुसरी या मुंबईकरांच्या भेटीला लवकरच दाखल होणार आहेत. या खास मगरी, सुसरी यांना बघण्यासाठी महापालिका प्रशासन तब्बल 20 कोटी रुपये खर्चून नवीन ‘व्ह्यूविंग गॅलरी’ बनवणार आहे. त्यामुळे राणी बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून राणी बागेच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आता लवकरच या राणीच्या बागेत नंदनकाकन, ओदिशा आणि क्रोकोडाइल बँक मद्रास येथून काही मगरी व सुसरी आणण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून संबंधित ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -