घरमहाराष्ट्रसाखर महागली? सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री

साखर महागली? सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री

Subscribe

मागच्या दोन आठवड्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास साखरेच्या दरात सरासरी सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकचं नव्हे तर येत्या काळातही साखरेचे दर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

साखरेचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे देशात साखरेची प्रचंड मागणी आहे. पण उत्पादन घटल्याने साखरेचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या झळा सहन कराव्या लागतील. साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा चटका बसेल. त्यांना साखरेसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

मागच्या दोन आठवड्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास साखरेच्या दरात सरासरी सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकचं नव्हे तर येत्या काळातही साखरेचे दर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Sugar will be costly There has been a slight decline in sugar production in Maharashtra

- Advertisement -

अहवाल आणि आकडेवारी काय सांगते?

महाराष्ट्रातील साखर उत्पादनात काहीशी घट झाली आहे. साखरेच्या उत्पादनाला अनुसरुन असणाऱ्या 2022-23 या 30 सप्टेंबरपर्यंतच्या वर्षात महाराष्ट्रातून 1.05 कोटी टन साखरेचं उत्पन्न घेतलं जाण्याची शक्यता आहे. याआधी हे प्रमाण 1.37 कोटी टन इतकं होतं.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचाय? …तरच मिळणार परवानगी; कारण काय? )

- Advertisement -

साखरेच्या दरांमध्ये काही दिवसांत प्रति क्विंटल 50 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आकडेवारीचा आधार घ्यायचा झाल्यास M/30 ग्रेड साखरेचा एक्स मिल दर 3480 ते 3500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तामिळनाडूमध्ये हा दर 3550 ते 3600 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तर, कर्नाटकात 3550 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

गुजरातमध्ये साखरेचा दर प्रति क्विंटलमध्ये 3501 ते 3.541 रुपये इतका असून, पंजाबमध्ये हे दर 3725 ते 3771 रुपये प्रति क्विटंल इतका आहे. दिल्लीमध्ये साखरेला सर्वाधिक भाव मिळत असून हे दर 3969 रुपये प्रति क्विटंल इतक्या घरात आहेत.

( हेही वाचा: स्कायमेटचा ‘तो’ अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने फेटाळला; वाचा सविस्तर )

साखरेची अधिक मागणी

30 सप्टेंबर रोजी संपणाऱ्या मार्केटिंग वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 10.5 दशलक्ष टन उत्पादनाची शक्यता आहे. तर यापूर्वी 13.7 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज लावण्यात येत होता. येत्या काही महिन्यात किंमती अधिक भडकण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात घाऊक व्यापारी साखरेची अधिक मागणी नोंदवून खरेदी करु शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -