घरमहाराष्ट्रहिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले...

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

Subscribe

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्या राममंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचा सहभाग नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर यामुळे आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघावर हल्लाबोल केला आहे.

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्या राममंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचा सहभाग नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर यामुळे आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे. याबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघावर हल्लाबोल केला आहे.

भाजपची मला किव येते. एका बाजूला मोहन भागवत हे मशिदीत जातात. दुसऱ्या बाजूला बाबरीपण आम्हीच पाडली म्हणून सांगत आहेत. मग नेमके करायचे काय? यांचे हिंदुत्व नेमके आहे तरी काय? जसं मी सांगतो की आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्यांचे हिंदुत्व नाही तर राष्ट्रीय हिंदुत्व आहे, तसं भाजपने एकदा त्यांचे हिंदुत्व स्पष्ट करावे, असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असे चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा…
या मुद्द्यावर संतप्त प्रतिक्रीया देत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे जर शक्य होणार नसेल तर सत्तेसाठी लाळघोटेपणा करत गेलेल्या मिंधेंनी राजीनामा द्यावा, अशा जहरी शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर हे लोकं कोणाला जोडे मारणार की स्वतःच जोड्यांनी आपले थोबाड फोडून घेणार. कारण बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करणाऱ्यांसोबत केवळ सत्तेसाठी राहणाऱ्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना…; शरद पवारांचा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -