घरताज्या घडामोडीदंगल पेटवायची असेल तर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवा, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना...

दंगल पेटवायची असेल तर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवा, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान

Subscribe

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. परंतु मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजात आंबेडकरांनी मनसेवर टीका केली आहे. तुम्हाला दंगल पेटवायची असेल तर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवा, असं आव्हान सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय

दंगल पेटवणारे ब्राम्हण असतात आणि खाली लढणारे बहुजनांची मुलं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं, असं वादग्रस्त विधान सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. अमित ठाकरे यांना स्वत:पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं. की तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे प्रभावीत होऊन जे रस्त्यावर उतरतात ते बहुजन मुलं असतात, असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं.

- Advertisement -

दंगल पेटवायची असेल तर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवा

राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल आणि हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं आणि जर तुम्ही स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या मुलालाही उतरवू नका, असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.

माझं वक्तव्य पेटल्याचं अनेक जणांनी मला सांगितलं. कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लिम बांधव मनसेचा राजीनामा देत बाहेर पडले आहेत. २०१४ मध्ये भाजप अनेक आश्वासन देऊन सत्तेत आलं. मात्र नंतर पुढं काहीच नाही. त्यामुळं भाजप असो वा राज ठाकरे यांना हिंदू धर्मात दंगल पेटवायची आहे असं दिसतंय, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचा : भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, अमेय खोपकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -