घरठाणेझटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाची पूजा, पितळ उघड होताच भोंदूबाबा पसार

झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाची पूजा, पितळ उघड होताच भोंदूबाबा पसार

Subscribe

एका लाल कपड्यावर कासवाला ठेऊन पूजा सुरू असतानाच, काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार पाहून भोंदूबाबाला जाब विचारला. मात्र, आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने भोंदूने घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी हा प्रकार कल्याण पूर्वेत घडला आहे.

कल्याण – झटपट श्रीमंत होणे आणि अचानक धनलाभ व्हावा यासाठी काही जणांनी कल्याण पूर्वेत निर्जन ठिकाणी भोंदू बाबाचे सहकार्य घेऊन कासवाची पूजा सुरू केली होती. एका लाल कपड्यावर कासवाला ठेऊन पूजा सुरू असतानाच, काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार पाहून भोंदूबाबाला जाब विचारला. मात्र, आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने भोंदूने घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी हा प्रकार कल्याण पूर्वेत घडला आहे.

पूजेच्या ठिकाणी ठेवलेले कासव नागरिकांनी प्राणी मित्र संघटनेच्या ताब्यात दिले आहे. या संघटनेने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात कासव दिले. त्यांनी त्यांचा अधिवास असलेल्या सुरक्षित ठिकाणी सोडले. कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालय रस्त्यावरील झुडपांच्या मध्ये निर्जन ठिकाणी काही जण झटपट श्रीमंत होण्यासाठी एका भोंदू बाबाला हाताशी धरुन एका कासवाची पूजा करत होते.

- Advertisement -

हेही वाचा – ठामपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; अखेर सातवा वेतन आयोग लागू

या रस्त्यावरुन जात असलेल्या काही जागरुक पादचाऱ्यांना संशय आला. त्यांना झुडपांच्या मधून अगरबत्ती, उदाचा धूर येत असल्याचे दिसले. लाल कपड्यावर कासव ठेऊन त्याची पूजा केली जात असल्याचे दिसले. याठिकाणी काही तरी अघोरी कृत्य सुरू आहे असा संशय आल्याने जागरूक पादचारी जादूटोणा सुरू असल्याच्या ठिकाणी गेले. त्यांनी हा काय प्रकार सुरू आहे अशी विचारणा भोंदू बाबा आणि तेथे जमलेल्या तरुणांकडे केली. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी आम्ही हा प्रकार करत आहोत अशी माहिती दिली. अंधश्रध्देला बळी पडून तरुण अघोरी कृत्य करत असल्याचे समजल्यावर जागरुक पादचाऱ्यांनी पोलिसांना बोलविण्याची हालचाल केली. ही कुणकुण लागताच तरुणांसह भोंदूबाबाने तेथून पळ काढला.

- Advertisement -

ही माहिती प्राणी मित्र संघटनेला देण्यात आली. या संघटनेचे प्रेम आहेर घटनास्थळी आले. त्यांनी पूजेसाठी ठेवलेले कासव ताब्यात घेतले. ते वन विभागाच्या ताब्यात दिले. गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवली, कल्याण भागात कासवांची तस्करी केली जात आहे. जादुटोण्यासाठी कासवांचा वापर केला जात असल्याने पोलीस आता सतर्क झाले आहेत.

हेही वाचा – अच्छे दिन कुठे आहेत? भाजपाच्या आश्वासनांचा शरद पवारांकडून समाचार

पोलिसांनी अशा घटनांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तर, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा अघोरी घटना कोणाला कुठे आढळल्यास समितीशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -