घरमहाराष्ट्रपुणेSupriya Sule : पुढील दहा महिने बारामतीतच तळ ठोकून बसणार; सुळेंनी फुंकले...

Supriya Sule : पुढील दहा महिने बारामतीतच तळ ठोकून बसणार; सुळेंनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

Subscribe

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि शरद पवार गटातच वाद-विवाद सुरू आहेत. अशातच आता पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास आतापासूनच महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे.

बारामती : मी माझ्या पती आणि मुलांना सांगितलंय की, आता पुढचे दहा महिने मी मुंबईला येणार नाही. ऑक्टोबरपर्यंत मी बारामतीतच राहणार आहे. कारण यंदाची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे पुढचे काही महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्या इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. (Supriya Sule Will camp in Baramati for the next ten months Sule blew the trumpet of the Lok Sabha)

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि शरद पवार गटातच वाद-विवाद सुरू आहेत. अशातच आता पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास आतापासूनच महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील 48 जागांपैकी बहुतांश जागा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. एकूण 48 पैकी सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील मतदार संघ म्हणजे बारामती. याच मतदार संघात आता दादा गटाचा उमेदवार उतरणार की, भाजप नवा पर्याय देणार अशीच चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा मतदार संघ त्यांच्याकडेच रहावा म्हणून इंदापूरच्या सभेत रणशिंग फुंकले आहे. पुढील दहा महिने आपण बारामतीतच तळ ठोकून बसणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Train Traveling : हिवाळ्यातही रेल्वे प्रवासात का घेतले जातेय AC चे शुल्क? वाचून तुम्हीही म्हणाल…

सत्तेएवजी मी संघर्ष निवडला

इंदापूरच्या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता आणि संघर्ष असे माझ्यासमोर दोन पर्याय होते. सत्तेच्या बाजूला अमित शहा होते आणि संघर्षाच्या बाजूला शरद पवार होते. या दोन्हींपैकी एक पर्याय मला निवडायचा होता. मी संघर्षाचा पर्याय निवडला असे म्हणतच सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार यांच्याबाबत भावनिक उद्गारही काढले. त्या म्हणाल्या की, व्यक्तीने तुम्हाला जन्म दिला त्याला विसरता कामा नये. कोणीतरी सत्य बोलायला हवं. आपण सगळेच घाबरलो तर या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : BJP : गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास…, ठाकरे गटाची फडणवीसांवर घणाघाती टीका

बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्षं

बारामती लोकसभा मतदार संघ आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचं लक्षं वेधून घेणार असल्याची चित्र आहे. कारण, पवार कुटुंबातीलच व्यक्ती सुळेंच्या विरोधात उमेदवार म्हणून दिल्यानंतर बारामतीकर कुणाला निवडून देतील हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -