घरताज्या घडामोडीमुंबईतून पळालेल्या संशयित करोना रुग्णांना घेतले ताब्यात

मुंबईतून पळालेल्या संशयित करोना रुग्णांना घेतले ताब्यात

Subscribe

करोनावर उपचार घेत असलेल्या १५ संशयित करोना रुग्ण क्वारंटाईनमधून पळाले. परंतु या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले आहे.

करोनावर उपचार घेत असलेल्या १५ संशयित करोना रुग्ण क्वारंटाईनमधून पळाले. परंतु या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. तसेच ते १५ जण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत.

त्यांच्या हातावर क्वारनटाईनचा स्टॅम्प मारलेला होता. त्यांना क्वारनटाईनमध्ये सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५ जण क्वारनटाईन कॅम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.

- Advertisement -

दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या 387 वर पोहोचली. फक्त महाराष्ट्रातच 89 करोना रुग्ण आहेत. याशिवाय करोनामूळे महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि जमावबंदी जारी करण्यात आली आहे.

संशयित १५ करोना रुग्ण खारमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमच्या पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेतली. आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना पकडून पालिका अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. या सर्वांच्या हातावर क्वारनटाईन स्टॅम्प लावलेला होता. 

– गजानन कब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -