घरट्रेंडिंगन उम्र की सीमा हो.... 90 वर्षीय आजोबांनी 92 वर्षीय गर्लफ्रेंडशी...

न उम्र की सीमा हो…. 90 वर्षीय आजोबांनी 92 वर्षीय गर्लफ्रेंडशी केले लग्न

Subscribe

प्रेमाला वयाचे बंधन नसते. प्रेम कोणत्या वयात करावे किंवा करून नये हे कोणीही ठरवू शकत नाही. अशीच काहीशी एक प्रेम कहाणी समोर आली आहे. मॉरिस बेंटन (Morris Benton) आणि जोआन ओरिस (Joan Orris) यांची प्रेम कहाणी समोर आली आहे. ह्या प्रेमकहाणीतील प्रियकर मॉरिस बेंटन याचं 90 तर त्यांची प्रियसी जोआन ऑरिस वय 92 आहे. मॉरिस यांनी जोआन यांना प्रपोज केले. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री आणि दोघांनी अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर अखेर लग्न केले. हे दोघे लग्नाआधी 37 वर्ष एकत्र राहत होते. या वृद्ध जोडप्याला मो आणि जो या नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात ते त्यांच्या यूकेमधील सॉमरसेटच्या (Somerset) घरी गेले, आणि चर्चमध्ये (Church)जाऊन लग्न केले.

मॉरिस बेंटन आणि जोआन ओरिस हे दोघे आता पती-पत्नी झाले आहेत. जोआन ओरिसला गेल्या वर्षी 3 मार्चला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यादरम्यान त्यांनी तिला प्रपोज केलं. जोआन ओरिसही यांना दोन मुलं आहेत. तर आता ती सहा मुलांच्या आजी आहेत. तिच्या नातवांना आता 2 मुलेही असून ती पणजीही आहे. जोआन ओरिसहीने पहिल्या लग्नातून घटस्फोट घेतला आहे. आणि तिने दुसरे लग्न केले व तिचा दुसरा नवरा वयाच्या 50 वर्षी निधन पावला. तिने सांगितले की, मी मॉरिस बेंटन यांचा प्रस्ताव नकारला आहे. परंतु जेव्हा ह्रदयविकाराचा झटका आला आणि मला वाटले की, मला खूप वर्ष झाले नाही, म्हणून मी मॉरिस बेंटनबरोबर लग्न केले. जेव्हा मी मॉरिसला सांगितले की, मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. हे ऐकून त्याला पण धक्का बसला. आणि मला वाटले की, माझ्यासारखा त्यालाही ह्रदयविकाराचा झटका आला आहे. म्हणून आम्ही तेव्हापासून हसत एकत्र आहोत. असेही ती म्हणाली.

- Advertisement -

अशाच प्रकारची एक प्रेमकथा व्हायरल झाली होती. ती म्हणजे 93 वर्षीय मेरी हिल (Mary Hill) आणि 100 वर्षीय रॉन हेडलीची (Ron Headley) होती. ऑस्ट्रेलियातील कॅमेरॉन पार्क केअर कम्युनिटी सेंटरमध्ये भेटले. दोघांनी व्हीलचेअरवर बसून दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -