घरमहाराष्ट्रTeacher Recruitment : राज्यात पुन्हा 10 हजार शिक्षकांची भरती; 'या' महिन्यात होणार...

Teacher Recruitment : राज्यात पुन्हा 10 हजार शिक्षकांची भरती; ‘या’ महिन्यात होणार टीईटी

Subscribe

मुंबई : गेल्या वर्षीपासून शिक्षण खात्याने राज्यात 13 हजार 500 शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर आता नुकतीच राज्यात दहा हजार शिक्षकांची भरतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी केली जात असून यानंतर आता शिक्षक भरतीसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Teacher Recruitment Recruitment of 10 thousand teachers again in the state TET will be held in this month)

हेही वाचा – Nilesh Lanke : राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं, शरद पवारांच्या पक्षात जाण्याबाबत संदिग्धता

- Advertisement -

दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी असल्याने रिक्त शिक्षकांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले आहे. मात्र पाच ते सहा वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होताना दिसते. त्यामुळे आता शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या जून महिन्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने यासंदर्भात तयारी करण्याच्या सूचना केल्या असून लवकरच परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे.

हेही वाचा – Amravati : पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

- Advertisement -

राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना सीईटी परीक्षा द्यावी लागते.  घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने 13500 शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -