घरताज्या घडामोडीठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये कार्यालय मिळण्याची शक्यता, खासदारांनी घेतली अध्यक्षांची भेट

ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये कार्यालय मिळण्याची शक्यता, खासदारांनी घेतली अध्यक्षांची भेट

Subscribe

काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये असलेलं शिवसेनेचं कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आलं होतं. परंतु ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये स्वतंत्र कार्यालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.

संसदेमध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलेला होता. आता ठाकरे गटाला नवीन संसेदत कार्यालय मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षावर हक्क सांगण्यास सुरूवात केली होती. आता शिवसेना पक्षच शिंदेंच्या ताब्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचं काय होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत होता. मात्र, आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यापूर्वी खासदारांनी पत्र लिहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी पक्षकार्यालय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता खासदारांनी थेट बिर्ला यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

28 जुलै 2022 रोजी शिंदे गटाने संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले होते. एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचाही वेगळा गट स्थापन केला होता. 12 खासदार हे शिंदे गटात होते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली होती. तसेच शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती. 19 जुलै रोजी शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्याबाबतचे पत्र दिले होते. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली होती.

- Advertisement -

हेही वाचा : पुरवणी मागण्यांचा वापर आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी, थोरातांचा घणाघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -