घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवर्दळीच्या रस्त्यावर पायी जात असताना बिबट्याची झडप; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

वर्दळीच्या रस्त्यावर पायी जात असताना बिबट्याची झडप; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

नाशिक : गेला महिनाभरापासून नाशिकरोड परिसरातील गुलमोहर कॉलनी आनंदनगर भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्लात एकजण थोडक्यात बचावला होता. नाशिकरोड परिसरात बिबट्याच्या संचारामुळे भीतीचे वातावरण असतानाच येथील आनंदनगर भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजता पायी घराकडे राजू शेख यांच्यावर बिबट्याने झडप घेत हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचे दर्शन होण्याच्या तसेच काही बिबट्याने हल्ला केल्याच्या घडल्या आहे. विशेषतः नाशिकरोड भागातील जी भवानी रोड, मळे विभाग, पांडवलेणीच्या आजूबाजूचा परिसर येथे वारंवार बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. या भागात बिबट्याचा मुक्त संचार असून त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, नाशिकरोड परिसरातील आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्या पाठीमागून हल्ला केला. यावेळी या रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने येथे गर्दी जमली. स्थानिकांनी तात्काळ शेख यांना रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. येथील गुलमोहर कॉलनीतील एका बंगल्यात बिबट्या शिरल्याचा कयास असल्याने या बंगल्याजवळ मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक जमा झाले होते. सध्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -