घरमहाराष्ट्रThackeray Group : ट्रिपल इंजिन सरकार असूनही सभागृहात एकही नाही; सचिन अहिरांनी...

Thackeray Group : ट्रिपल इंजिन सरकार असूनही सभागृहात एकही नाही; सचिन अहिरांनी सरकारला घेरलं

Subscribe

घोषणा खूप झाल्या पण याची गॅरंटी कोण घेणार आहे. पंतप्रधानानी पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. आज कुठल्याही वर्तमानपत्रात मोदी की गॅरंटी वाचायला मिळते. परंतु राज्यात कोण गॅरंटी घेणार आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार असून, सभागृहात एकही इंजिन दिसत नाही. विधान भवन परिसरात असलेली गर्दी ही कार्यकर्त्यांची नसून, ती कंत्राटदारांची गर्दी आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी ठाकरे गटाने महायुती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. विधान परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी ट्रीपल इंजिन सरकार असूनही सध्या सभागृहात कुणीच नाही म्हणत मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. (Thackeray Group Triple Engine Government Despite None in House Sachin Ahir surrounded the government)

अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, अंतरिम अर्थसंकल्प मांडला हा राज्याला दिवाळखोरीकडे घेऊन जाणार आहे. खूप मोठी वित्तीय तूट असून, राज्यावर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार आहे.

- Advertisement -

घोषणा खूप झाल्या पण याची गॅरंटी कोण घेणार आहे. पंतप्रधानानी पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. आज कुठल्याही वर्तमानपत्रात मोदी की गॅरंटी वाचायला मिळते. परंतु राज्यात कोण गॅरंटी घेणार आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार असून, सभागृहात एकही इंजिन दिसत नाही. विधान भवन परिसरात असलेली गर्दी ही कार्यकर्त्यांची नसून, ती कंत्राटदारांची गर्दी आहे. देशात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. नागरिकरण झपाट्याने वाढतेय त्यामुळे शेती भविष्यात टिकणार की नाही असा प्रश्न पडतो. देशात शेतकरी खूश नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मितीची कुठलीच तरतूद नाही. त्यामुळे निव्वळ घोषणा होत आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याची टीका आमदार सचिन अहिर यांनी केली.

हेही वाचा : IND Vs ENG: पाचव्या कसोटीसाठी धर्मशाळेत ‘या’ खेळांडूसह उतरणार; वाचा- कोणाला मिळाली संधी?

- Advertisement -

पुढे बोलताना आमदार सचिन अहिर म्हणाले की, मागासवर्गीयांसाठी 40 कोटी रुपयांची घोषणा केली. परंतु निधी खर्च करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. अनेकांना योजनांचा लाभ मिळाला नाही. मग नेमका पैसा जातो कुठे? हा मूळ प्रश्न आहे. स्मारकांसाठी तरतूद करण्याचं काम केलं. ही काही नवीन घोषणा केली नाही. याआधीच्या सरकारने घोषणा केली होती. त्या सरकारने केलेल्या घोषणावर लादण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आणि घोषणा केली असेही यावेळी आमदार सचिन अहिर म्हणाले.

हेही वाचा : Nilesh Rane : थकबाकी 25 लाखांची, बजावले 3 कोटी; पालिका म्हणते चुकून झाले

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत की नाही? महिलांना साडी वाटप करण्याचं काम केले जात आहे. परंतु त्यांच्या सुरक्षेवर प्रयत्न केले जात नाहीत. विद्यार्थी आनंदी नाही, शेतकरी आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांचेही प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. आज 60 हजार ग्रामपंचायतीचे कर्मचारी वेतनासाठी कामबंद आंदोलन करत आहेत. परंतु त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी कुठलेही पावले उचलली जात नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही अनेक कामे प्रलंबित आहेत. शालेय शिक्षण विभागामध्येही अनेक प्रश्न आहेत. आरटीआय कायद्यांतर्गंत सर्वाना शिक्षण मिळाले पाहीजे असे आपण म्हणतो परंतु यामध्ये फेरबदल करुन अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केले जात असल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -